01-09-2018 - 03-09-2018

RYLA in Creative Public School... ०१/०९/२०१८ रोटरी क्लब कर्वे नगर व गच्चीवरची मातीविरहीत बाग यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री. तांबे काका,सायली ताई, शहा सर, नितु शहा ताई व महेश सर यांनी क्रियेटिव पब्लीक स्कूल मध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कचऱ्यातून खतनिर्मिती ह्या विषयावर मुलांना व्याख्यान देवून प्रात्यक्षिक करून दाखवले. ह्या व्याख्यानानासाठी रोटरी कल्ब कर्वेनगरचे प्रेसिडन्ट श्री.शिरीश पुराणिक, व्हा.प्रेसिडन्ट मनिषा पुराणिक, सेक्रेटरी आशा आमोणकर, युथ डायरेक्टर सेजल & समीर रूपलग, CPS चे मुख्याध्यापक श्री.तांबे सर, CPS चे उपमुख्याध्यापक सौ.आशा पालवे, सर्व शिक्षक इ. उपस्थित होते. मुलांनी फारच उत्साहाने प्रतिसाद देत सगळे व्याख्यान समजून घेऊन ऐकले. चौकस बुद्धीने प्रश्न विचारले. आणि कुतूहलाने सगळी माहिती आत्मसात करून घेतली. त्यानंतर शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे *आम्ही कचरा वर्गीकरण करू, घरी तयार होणारा आपला कचरा घरीच जिरवू, शेजाऱ्यापाजार्यांना कचरा जिरवण्याची माहिती देऊन त्यांना पण खत बनवायला उद्युक्त करू, आणि आपला परिसर स्वच्छ ठेवू* अशी शपथ देखील घेतली.

Project Details

Start Date 01-09-2018
End Date 03-09-2018
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 50
No of direct Beneficiaries 300
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Literacy